
कोल्हापूर, दि. १० – लोकायुक्त विषयी समग्र प्रबोधन आणि जनमताचा दबाव वाढविण्यासाठी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासचे संस्थापक अण्णा हजारे यांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. यामध्ये येत्या २७ मेपासून ते पश्चिम महाराष्ट्र दौर्यास प्रारंभ करणार आहेत. सातार्यानंतर २८ मे रोजी सांगली आणि २९ मे रोजी कोल्हापूरात जाहीर सभा होणार आहेत.
कोल्हापूर ऐतिहासिक शाहू खासबाग मैदानात ही अण्णा हजारे यांची जाहीर सभा होणार असून त्यानंतर ते कोकणकडे रवाना होणार आहेत. यासाठी तालुका संपर्क दौरे सुरू आहेत अशी माहिती जिल्हाध्यक्ष नारायण पवार यांनी दिली आहे.
