भारतातील प्रमुख व्यावसायिक नेटवर्किंग साईट्स

भारतात व्यावसायिक नेटवर्किंग करणाऱ्या साईट्स वेगाने फोफावत असून त्या फार छान काम करत आहेत. परस्परसंपर्क आणि परस्परसंवाद हा त्यांचा मुख्य उद्देश असला तरी व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी त्या महत्वाचे साधन ठरल्या आहेत. या साईट्समुळे वेतनधारकांना आपल्या व्यावसायिक हितसंबंधांना अनुसरून एकमेकांना सहकार्य करता येते, ज्ञानाची देवाणघेवाण करता येते, माहिती मिळवता येते आणि परिणामतः त्यांच्या व्यावसायिक संधींमध्ये चांगलीच वाढ होते. अनेक तज्ञांच्या मते अशा साईट्सना फार मोठी मागणी असल्याने नौकरी, मौन्स्टर आणि टाईम्स जॉब्ज अशा जॉबबोर्ड वेब साईट्सचा व्यवसायही चांगलाच वाढला आहे. म्हणजेच डीजीटल माध्यमातुन व्यावसायिक जगताशी जोडून द्यायचे असल्यास अशा वेबसाईटची माहिती असणे आवश्यक आहे.

1.) सिलिकॉन इंडीया : नेटवर्क, करियर, जॉब, लाईफ, बातम्या, ब्लौग आणि इतर अनेक सुविधा पुरविणारी ही साईट सामाजिक आणि व्यावसायिक गुणवैशिष्ट्यांच्या संयोगामुळे अग्रगण्य मानली जाते. भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या या साईटचे सदस्य २ दशलक्ष असुन त्यात दर आठवड्याला सुमारे ५०,००० सदस्यांची भर पडते.

2.) ब्रिज : याही वेबसाईटची सदस्यसंख्या तीन दशलक्षाहुन अधिक असुन त्यापैकी दोनहजार सीईओ आहेत तर सातहजार संचालक आहेत. भारतात जॉब पोर्टलचा पाया घालणाऱ्या नौकरी.कॉमनेच या साईटची सुरुवात केली. त्यामुळे या दोन्ही साईट्सचा आपसात चांगलाच ताळमेळ आहे. व्यावसायिकांना योग्य उमेदवार शोधुन देण्यास त्या मोलाची मदत करतात. नौकरी.कॉमकडे १० लाखावर उमेदवारांची माहिती असुन नोकरदारांना ब्रिज.कॉमद्वारे अधिक चांगली नोकरी मिळविण्याची संधी दिली जाते.

3.) अपनासर्कल : या व्यावसायिक-सामाजिक नेटवर्कींग साईटचा आरंभ तीन वर्षांपूर्वी झाला. या साईटचा प्रमुख उद्देश आहे ‘व्यावसायिक आणि करियर’ नेटवर्कींग. जगातील दुसऱ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी व्यावसायिक-सामाजिक नेटवर्कींग साईट असल्याचा दावा करणाऱ्या या साईटची सदस्यसंख्या दरदिवशी सहा हजारांनी वाढते. फेसबुक मित्रांसाठी लोकप्रिय आहे तर अपनासर्कल व्यावसायिकांसाठी!

4.) वेपर : ही साईट वापरणारे आपल्या करियरला चालना देऊ शकतात, मित्रांशी, सहकाऱ्यांशी आणि समविचारी व्यक्तींशी संपर्क ठेऊ शकतात. त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातील नोकऱ्यांचा शोधही घेता येतो. छोट्या व्यवसायांसाठी ही वेबसाईट आदर्श आहे.

5.) क्रिओ : बेंगलोरस्थित औत्सुक्यपूर्ण अशी ही वेबसाईट शब्दार्थशास्त्रावर आधारित आहे. या मंचाच्या माध्यमातुन नवनवीन ज्ञानाचा शोध घेण्याबरोबरच सामाजिक संपर्कातुन मिळवलेल्या ज्ञानाची देवाणघेवाण करून त्या ज्ञानात भरही घालता येते. या वेबसाईटवर शब्दार्थशास्त्राचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

6.) बिपीओ सूत्र : बेंगलोरमधील हे आणखी एक स्वदेशी पोर्टल. ही वेबसाईट फक्त बिपीओ उद्योगात कार्यरत असलेल्या लोकांच्या गरजांची पूर्तता करते. या आगळ्यावेगळ्या वेबसाईटचे सात लाखाहुन अधिक सदस्य आहेत. यातुन सदस्यांच्या करियर, जीवनशैली व व्यवसायात वाढ करण्याचा प्रयत्न केला जातो.

7.) पीर पॉवर : टाईम्स बिझनेस सोल्युशनने ही व्यावसायिक नेटवर्कींग साईट सुरु केली. व्यवसायांची देवाणघेवाण हा या साईटचा प्रमुख उद्देश आहे.

8.) कनेक्शन्स : २००४ साली रेडीफने आपल्या या व्यावसायिक शाखेची सुरुवात केली. भारतात मात्र या वेबसाईटला म्हणावी तशी लोकप्रियता लाभली नाही. हिची सदस्यसंख्याही ३०,००० पर्यंतच मर्यादित आहे.

9.) टूस्टेप : या साईटच्या माध्यमातुन व्यावसायिकांशी संपर्क साधुन, त्यांना आपली तपशीलवार माहिती कळवुन त्यांची ओळख करून घेता येते. नेतृत्वगुण, शिक्षण, गुंतवणुक, व्यावसायिक धोरणे अशा विविध विषयांवरील माहितीपुर्ण लेखही यातुन वाचता येतात.

10.) पीपीएसझेड : व्यावसायिक यशस्वितेसाठी प्रत्येक गोष्ट पुरविण्याचा दावा या वेबसाईटकडुन केला जातो. येथून माहितीच्या देवाणघेवाणीबरोबरच नेतृत्वगुण विकास, व्यापारी मार्ग, चानल्स, व्यापारातील सर्वोत्तम व्यवहार, व्यापारी धोरणे, व्यावसायिकतेच्या प्रेरणा यांच्याविषयीची अद्ययावत माहिती दिली जाते. निरनिराळ्या क्षेत्रातील व्यवसायांनी डिजीटल माध्यमाची ताकद ओळखली आहे. शिवाय अशा व्यावसायिक सामाजिक साईट्सवरून लोकांना नोकरीच्या शोधाबरोबरच समविचारी मित्रांचाही शोध घेता येतो. तेव्हा या साईट्सच्या माध्यमातुन करियरची जोमदार सुरुवात करायला काहीच हरकत नाही.

Leave a Comment