महाकाय बुद्धीबळ राजा

सेंट लुईस, दि. ९  – जगातील सर्वात मोठ्या बुध्दीबळातील राजाचे अनावरण आज होत असून सेंट लुईस येथील वर्ल्ड चेस हॉल ऑफ फेमच्या फरसबंद अंगणात हा महाप्रचंड महाकाय राजा दिमाखात उभा राहिला आहे. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसने नोंद घेतलेल्या या राजाची उंची आहे तब्बल ४.४६ मीटर. त्याचा तळाचा व्यास आहे १.८३ मीटर आणि वजन ? ते आहे १०३४ किलो.
  विशेष म्हणजे २०१२ च्या यूएस चेस चँपियनशीप स्पर्धा सुरू होत असतानाच या राजाचे अनावरण व्हावे हा दुग्धशर्करा योगच म्हणायला हवा.