
लंडन, दि. ४ – भारतीय पुरुष हॉकी संघाला सलग दुसर्यांदा पराभवाचा सामना करावा लागला. साखळी सामन्यात इंग्लंडने ४-२ अशा फरकाने भारताचा पराभव केला. ब्रिटीश स्ट्रायकर रॉव मूर आणि सिमॉल मॉंटेल यांनी सामन्याच्या ११ व्या मिनीटाला दोन गोल करुन भारतावर आघाडी मिळविली. त्यानंतर भारताच्या रघुनाथने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करीत गुणांचे खाते उघडले. पण ऍश्ले जॅक्सनने दोन गोल करीत ब्रिटीश संघाला निर्णायक क्षणी आघाडी मिळवून दिली. अखेरच्या काही वेळात भारताच्या संदिप सिंहने एक गोल केला. पण तोपर्यंत सामना भारताच्या हातून निसटला होता. याआधी भारताने कांगारु विरुद्ध ०-३ असा पराभव पत्कारला होता. या स्पर्धेत भारताचा पुढचा सामना जर्मनीशी होणार आहे.
