तिबेटी संस्कृतीच्या रक्षणासाठी स्वायत्तता आवश्यक – दलाई लामा

टॉरेंटो, दि. ३० – तिबेटी संस्कृतीच्या संवर्धन व रक्षणासाठी आही चीनकडे संपूर्ण स्वातंत्र्य मागत नसून, आम्हाला पर्याप्त स्वायत्तता हवी असल्याचे तिबेटींचे धार्मिक गुरू दलाई लामा यांनी सांगितले. दलाई लामा सध्या कॅनडाच्या दौर्‍यावर आहेत.
    ओटावा येथे त्यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना आपली भूमिका स्पष्ट केले. शनिवारी त्यांनी येथे एका जनसभेला देखील संबोधित केले. या सभेत त्यांचे विचार ऐकण्यासाठी हजारो लोक एकत्र जमले होते. दलाई लामा यांनी कॅनडाचे पंतप्रधान स्टीफन हार्पर यांची प्रशंसा केली. जगातील बलशाली अर्थव्यवस्थांपैकी एक असलेल्या चीनसोबतचे आर्थिक संबंध आणि तिबेटमधील मानवाधिकार हननासंबंधी राजकीय भूमिका यांच्यात हार्पर यांनी योग्य समन्वय साधल्याचे दलाई लामा म्हणाले. कॅनडाने चीनसोबतचे संबंध कायम ठेवावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.