सोनाक्षीला वाढदिवसाची भेट

रौडी राठोड हा बहुचर्चित चित्रपट १५ जूनऐवजी आता १ जूनलाच रिलीज केला जाणार असल्याचे खात्रीलायकरित्या समजते. योगायोग असा की या चित्रपटाची नायिका सोनाक्षी सिन्हा हिचा वाढदिवस आहे दोन जूनला. म्हणजे चित्रपट रिलीज झाला की लगेच दुसरे दिवशीच. सोनाक्षीच्या मते ही तिला वाढदिवसाची भेटच आहे. हा चित्रपट सुपरडुपर हिट व्हावा अशीही तिची इच्छा आहे.
  अंदर की बात अशी की रौडी राठोड अगोदर १५ जूनलाच रिलीज होणार होता कारण त्याअगोदर आमीरची भूमिका असलेला तलाश रिलीज होणार होता. मात्र तलाशचे प्रदर्शन त्याच्या निर्मात्यांनी या वर्षअखेरीवर ढकलले आहे. त्यामुळे मोठी स्पर्धा टळल्याच्या आनंदात रौडी १ जूनलाच प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवाय आपल्या आयपीएलचा हंगामाही तोपर्यंत संपतो आहे. म्हणजे प्रेक्षक रौडी पाहण्यास रिकामे असणार हा ही हेतू त्यामागे आहेच.
   अक्षय कुमार रौडी राठोड मध्ये नायकाची भूमिका साकारत आहे.

Leave a Comment