मुंबई दि.२७- एकेकाळचा सुपरस्टार राजेश खन्ना याला प्रकृती अस्वास्थामुळे बांद्रयांच्या लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजेश खन्ना गेले काही दिवस आजारी असून सोमवारपासून त्याला अशक्तपणा जाणवत होता. मंगळवारी त्याची तब्येत अधिकच बिघडली तेव्हा कुटुबियांनी त्याला रूग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला.
राजेश सोबत त्याची पत्नी डिंपल असून रूग्णालयातील व्यवस्थेबाबत तिने नाराजी व्यक्त केली असल्याचे समजते. राजेशवर व्हीआयपी रूममध्ये उपचार सुरू आहेत.
राजेश आणि डिंपलचा विवाह ७३ साली झाला होता मात्र ८४ पासून ते वेगळे राहात आहेत. त्यांनी घटस्फोट घेतलेला नाही. त्यांना दोन कन्या असून ट्विंकल हिचा विवाह अक्षय कुमारशी झाला आहे तर रिंकी हिचा विवाह लंडन येथील बँकींग इन्व्हेस्टर समीर शरण याच्याबरोबर झाला आहे.