`चेन’ चा शोध लावणार्‍या सॅडबॅक यांना गुगलच्या होमपेजवर अनोखी आदरांजली

पुणे, दि. २४  – वस्त्र निर्मिती उद्योगाच्या विकासात ‘चेन’ चा शोध लावून अमुलाग्र बदल घडवणारे अभियंत्ते गिडिओन सँडबॅक यांच्या १३२ व्या जयंत्तीनिमित्त गुगलने आपल्या होम पेजवर ‘चेन’ची प्रतिकृती झळकवून सँडबॅक यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहिली आहे.
    सँडबॅक यांचा जन्म २४ एप्रिल १८८० रोजी स्विडन येथे झाला. महाविद्यालयीन शिक्षण  स्विडन येथून  आणि जर्मनीमधून अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर १९०५ मध्ये त्यांनी कामाला सुरूवात केली. ‘जुडसोन सी-क्युरिटी फास्टनर’ या कंपनीत कार्यरत असताना त्यांना चेनची कल्पना सुचली. त्याकाळी असणार्‍या ‘इंटर लॉक हुक’च्या संकल्पनेवर आधारीत चेनची निर्मिती सँडबॅक यांनी केली. १९१४ मध्ये ‘हुकलेस-२’ या नावाने त्यांची पहिली मेटलची चेन विकसीत झाली. त्याचे पेटंट त्यांना १९१७ साली देण्यात आले. ‘बीएफ गुड रीच’ या कंपनीने सर्वात प्रथम बुटांमध्ये या चेनचा वापर करून बाजारात आणले. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात वस्त्रनिर्मिती उद्योगात ट्राऊजर आणि स्कर्टमध्ये या चेनचा वापर पहिल्यांदा करण्यात आला. वस्त्र निर्मिती उद्योगाबरोबरच चेन तयार करणार्‍या यंत्राचा जनक म्हणूनही सँडबॅक यांना ओळखले जाते.

Leave a Comment