२४, २५ एप्रिलला मुंबईतील नऊ भागांत २० टक्के पाणी कपात

मुंबई, दि. २१ – मुंबई महानगरपालिकेतर्फे पूर्व द्रूतगती महामार्गावरील नवघर रोड जंक्शन मुलुंड (पू) येथे ६०० बाय ७५० मि. मी. व्यासाच्या जलवाहिनी जोडणीचे काम तसेच २३४५ बाय ६०० मि. मी. व्यासाच्या जलवाहिनी जोडणीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे मंगळवार, २४ एप्रिल रोजी सकाळी १० ते २५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. तरी या भागातील नऊ भागांत २० टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे.
पूर्व उपनगरातील एम/पूर्व, एम/पश्चिम विभाग तसेच एम, एस व टी विभाग (अंशत:) त्याचप्रमाणे शहर विभागातील एफ/दक्षिण व एफ/उत्तर विभाग तसेच बी विभाग व ई विभाग (अंशत:) पाणी कपात होणार आहे. तरी पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.