पुण्यात स्थानिक गुन्हेगारावर गोळीबार

पुणे – पुण्यातील सराईत गुन्हेगार रंगनाथ बन्सी जाधव याच्यावर दुपारी चार ते पाच अज्ञात इसमांनी गोळीबार केला. या गोळीबारातून जाधव थोडक्यात बचावला. याबाबत खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव हा कासेवाडी परिसरातील स्थानिक गुन्हेगार आहे. त्याच्यावर २० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास तो कासेवाडीतील राजीव गांधी पतपेढीमध्ये आला होता. आसपास असलेल्या आरोपींचा त्याला संशय आल्याने तो सावध होता. तो पतपेढीत असतानाच त्याच्यावर चार ते पाच अज्ञात इसमांनी गोळीबार केला. मात्र,  तो त्वरित बाजूला झाल्याने थोडक्यात बचावला. जाधव याच्यावर ग्रामीण हद्दीत या अगोदरही गोळीबार झाला होता. त्याच आरोपींनी हा हल्ला केला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली