पुणे, दि. १५ – लोणचे आणि सरबतासाठी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात लिबांना मागणी होत असल्याने, गेल्या आठवड्याच्या तुलनेत गोणीमागे १०० रुपयांची दरवाढ झाली आहे. चांगल्या लिबांच्या गोणीस ११०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. तर लिंबाची प्रत खरात आणि लहान आकाराच्या लिंबाच्या गोणीस २०० रुपये भाव मिळाला. तसेच बाजारात आलेल्या लिंबाचा दर्जा चांगला नाही, तरी ग्राहकांकडून मागणी अधिक असल्याने लिंबास दर चांगले मिळत आहेत. काल मार्केटयार्डात २ ते २.५ हजार गोणीची आवक झाली
