संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान बारामतीतील काळखैरेवाडी ग्रामपंचायत द्वितीय

पुणे, दि. १५ – संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०१०-११ अंतर्गत ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामपंचायत स्पर्धे’चा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आले. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील हातनुर ग्रापंचायतीने प्रथम क्रमांक, तर बारामती तालुक्यातील काळखैरेवाडी ग्रामपंचायतीने द्वितीय क्रमांक पटकावला. तृतीय क्रमांकासाठी पन्हाळा तालुक्यातील आंबवडे ग्रामपंचायत पात्र ठरली. अनुक्रमे १० लाख, ८ लाख आणि ६ लाख रुपयांचे हे पुरस्कार आहेत.  
    विधानभवनातील कौन्सिल हॉल येथे हे पुरस्कार विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी जाहीर केले. यावेळी नागपूरचे अप्पर आयुक्त आनंद भरकाडे, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अनिल कवडे, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आदी उपस्थित होते.

Leave a Comment