चंद्रपूर, दि.१४ – चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक रविवारी होत असून ६६ जागांसाठी ४५८ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर निवडणूक लढत असल्यामुळे महापालिका त्रिशंकू होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या निवडणुकीत १९७ महिला उमेदवार रिंगणात असून, ५ प्रभागात महिलाविरुद्ध पुरुष असा सामना रंगणार आहे. ३३ प्रभागात ४५८ उमेदवारांमध्ये तब्बल १९७ महिला उमेदवार रिंगणार आहेत. भाजप, कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे आणि युवा शक्ती हे पक्ष स्वबळावर निवडणूक लढवित असल्यामुळे उमेदवारांची भवितव्य मतदार ठरविणार आहे. शिवसेनेने ३५ उमेदवार रिंगणात उतरवले असून याचा फटका भाजपला बसणार आहे.
कॉंग्रेस राष्ट्रवादीमध्ये हीच अवस्था आहे. कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नसल्यामुळे एकमेकाचा आधार निवडणूकीनंतर घ्यावा लागणार आहे. प्रथमच चंद्रपूर महापालिकेची निवडणूक होत असल्यामुळे सर्व राजकीय पक्षांच्या नजरा महापालिकेत कोणाची सत्ता येणार याकडे लागले आहे. मतदानासाठी शहरात चोख पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता विशेष खबरदारी घेतली जात आहे.
