लष्करप्रमुखांनी घेतली नेपाळच्या राष्ट्राध्यक्षांची भेट

काठमांडू, दि. ५ – लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंह यांनी गुरूवारी नेपाळचे राष्ट्राध्यक्ष राम बरन यादव यांची भेट घेवून देशात शांतता आणि समृद्धी नांदण्यासाठी शुभेच्छा दिल्या. 
  नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन आणि मदतकार्य यांवर आयोजित तीन दिवसीय कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह नेपाळमध्ये दाखल झाले आहेत. राष्ट्राध्यक्ष राम बरन यादव यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. यावेळी नेपाळमधील भारतीय राजदूत जयंत प्रसाद देखील उपस्थित होते. दरम्यान, या बैठकीच्या वेळी सिंह यांनी नेपाळमध्ये शांतता आणि समृद्धी नांदावी अशी इच्छा प्रकट केली.
यावेळी राष्ट्राध्यक्ष राम बरन यादव यांनी भारत आणि नेपाळमधील मैत्रीपूर्ण संबंधांवर प्रकाश टाकला. या दौर्‍यादरम्यान लष्करप्रमुख  पंतप्रधान बाबूराम भट्टाराई आणि उपपंतप्रधान तसेच संरक्षण मंत्री बिजयाकुमार गछादर यांची देखील भेट घेणार आहेत. बुधवारी लष्करप्रमुखांनी नेपाळी लष्करप्रमुख जनरल चत्रमान सिह गुरूंग यांची भेट घेतली.