आयपीएलचा नफा तरूणांच्या कामी येणार – श्रीनिवासन

चेन्नई, दि. ५ – भारतीय क्रिकेट नियंत्रक  बोर्ड (बीसीसीआय) चे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी आयपीएलमध्ये होणार्‍या नफ्याचा उपयोग नवीन खेळाडूंवर करण्याचे ठरविले असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धेत होणार्‍या नफ्याचा उपयोग नवीन आणि तरूण खेळाडूंच्या भविष्यातील प्रगतीसाठी खर्च करण्यात येणार आहे. या फायद्याचा वापर ज्या खेळाडूंनी भारतीय क्रिकेटमध्ये आपले योगदान दिले आहे, अशा खेळाडूंसाठी देखील करण्याचे श्रीनिवासन यांनी सांगितले.

     बीसीसीआय बोर्ड आपल्या या योजनेतून सुमारे १८५ खेळाडूंना मदत करणार आहे. ही मदत म्हणजे ज्या खेळाडूंनी भारतीय क्रिकेटला फायदा करून दिला आहे, अशा खेळाडूंना धन्यवाद देण्याचा एक प्रकार आहे, असे श्रीनिवासन यांनी सांगितले. आयपीएल स्पर्धेत होणार्‍या नफ्याचा उपयोग अशा खेळाडूंच्या प्रशिक्षणापासून कि‘केटसाठी होणारा खर्च या सर्वांसाठी करण्यात येणार आहे. ज्या खेळाडूंची आर्थिक परिस्थिती कमजोर आहे, अशा खेळाडूंच्या प्रॅक्टिस मैदानापर्यंतचा खर्च सुद्धा या फायद्यातून करण्यात येणार असल्याचे श्रीनिवासन यांनी सांगितले.

Leave a Comment