पुणे दि.३- स्टुंडंटस् इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया म्हणजेच सिमी या संघटनेवर बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक अधिनियमानुसार बंदी घालण्यात आली असून अशी बंदी घातल्याचे जाहीर का करू नये अशी नोटीस न्यायाधिकरणाने जारी केली आहे. पुणे जिल्ह्यातील सिमी कार्यकर्त्यांनी दिल्लीत होणार्या सुनावणीस उपस्थित राहावे अशा नोटीसा पुणे पोलिसांनी पुण्यातील सिमी कार्यकर्त्यांना बजावल्या आहेत असे समजते. दिल्लीत ११ एप्रिल रोजी दुपारी दिल्ली उच्च न्यायालयात ही सुनावणी होणार आहे.
अमेरिकेतील ९/११ च्या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने सिमी या संघटनेवर बंदी घातली आहे.
