संशयास्पद कारमधून २ कोटी रूपये जप्त

रांची, दि. ३० – राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर रांची येथे एका कारमधून पोलिसांनी शुक्रवारी दोन कोटी रूपये जप्त केले. नमकूम येथे सदर कार ताब्यात घेण्यात आली. या कारचा मालक जमशेदपूर येथील स्टील कारखान्यामध्ये कामाला असल्याचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक साकेतकुमारसिंह यांनी सांगितले. पोलिस आणि आयकर विभागाने संयुक्तपणे ही कारवाई केली. राज्यसभा निवडणुकीशी एवढ्या मोठ्या रक्कमेचा काही संबंध आहे का या प्रश्नावर उत्तर देताना साकेतकुमार यांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे सांगितले.