अवैध खाणकाम प्रकरणी चौकशीचे आदेश

पाटना, दि. २८ – नोवाडा जिल्हयातील बेकायदेशीर खाणकाम प्रकरणी तपासाचे आदेश दिले असल्याचे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुधवारी सांगितले.
राज्यातील खाण विभागाच्या अधिकार्‍यांसोबत मिळून स्थानिक गुडांनी करोडो रूपयांचे अभ्रक खनिज मोठ्या प्रमाणात भाकंप खाणीतून अवैधरित्या बाहेर आणले, असा आरोप सत्ताधारी जेडीयूचे आमदार प्रदीप कुमार यांनी केला. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासंबंधी आर्थिक गुन्हे विभाग चौकशी करून लवकर अहवाल सादर करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.