मध्य चिलीला ७.२ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का

सँटिऐगो, दि. २६ – मध्य चिलीला रविवारी मध्य रात्री जोरदार भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.२ इतकी मोजण्यात आली आहे. या भूकंपामुळे राजधानी सँटिऐगोमधील काही इमारतींना तडे गेले आहेत. समुद्र किनार्‍यावरील अनेक घरांचे नुकसान झाले आहे. या भूकंपाचा केंद्र बिदू टाल्का गावापासून ईशान्येकडे सुमारे १०३ किमी अंतरावर होता, असे संबंधित अधिकार्‍यांनी सांगितले. हवामान विभागाकडून अद्याप त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही.
  मध्य चिलीला २०१० साली ८.८ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला होता. या भूकंपात सुमारे ५०० जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे रविवारी रात्री झालेल्या भूकंपाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.