नवी दिल्ली, दि. २६ – कुडानकुलम अणु प्रकल्पाच्या सुरक्षेबद्दल सरकारने जनतेला विश्वास देऊनही त्याला वारंवार होणार्या विरोधामागे छुपा हेतू असल्याचे केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी सोमवारी सांगितले. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सभेत ते बोलत होते. तामिळनाडू राज्यात विजेची चणचण भासत असल्याने या प्रकल्पाची गरज असल्याचे ते म्हणाले. तसेच राज्य सरकारला लवकरात लवकर यासंदर्भात उपाय शोधण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. कुडानकुलम अणु प्रकल्पाला वारंवार होणार्या विरोधामागे काही लोकांचा छुपा हेतू आहे, असा दावा त्यांनी यावेळी केला.
दरम्यान, भारताला आपल्या शेजारी देशांशी चांगले संबंध ठेवायचे आहेत. मात्र, युएनएचआरसीमध्ये श्रीलंकेच्या विरोधातील ठरावाला भारताचा पाठिबा आहे, असे ते म्हणाले. अमेरिकेने मांडलेल्या श्रीलंकेविरुध्दच्या ठरावाला भारताने पाठींबा दिला आहे., असे त्यांनी सांगितले आहे.
