
छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध कार्यक्रम ‘मुवर्स अॅंड शेकर्स’ आता परत येत आहे. या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता शेखर सुमन याही पर्वात या शोचं सूत्रसंचालन करत आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात ज्येष्ठ समाजसेवी अण्णा हजारेंना आमंत्रित करण्याची शेखरची इच्छा आहे. यासंदर्भात अण्णाशी बोलणं झालं असून त्यांच्याकडून होकार असल्याचं बोललं जात आहे.
