स्टेट बँकेची शैक्षणिक कर्जावर विद्यार्थिनींना अर्धा टक्का ज्यादा सवलत

मुंबई- देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने शैक्षणिक कर्जावरील व्याजदरामध्ये १ टक्क्याने कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. स्टेट बँकेच्या या निर्णयाचे अनुकरण इतर बँकाकडून केले जाण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.सध्या या बँकेकडून कर्ज फेडीच्या कालावधीनूसार किमान १२.२५ टक्के ते कमाल १४.५० टक्के या दरम्यान व्याज आकारण्यात येते आता विद्यार्थिनींसाठी अर्धा टक्क्यांची सवलत देण्यात येणार आहे तर नवीन नियमांनूसार ४ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाचा व्याजदर ०.२५ टक्क्यांनी कमी झाला असून १३.५० टक्क्यांवर आला आहे तसेच ४ लाख रुपयांपेक्षा जास्त व ७.५ लाख टक्क्यांपेक्षा कमी कर्जावर १३.२५ टक्के व्याजदर आकारण्यात येणार आहे. तर ७.५ लाख रुपयांपेक्षा येणार आहे तर ७.५ लाख रुपयांपेक्षा अधिक कर्जावर १२ टक्के व्याज आकारण्यात येणार आहे. १११ शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षणासाठी बँकेकडून कर्ज पुरवठा केला जातो.