इरफानच्या चित्रपटाच्या होर्डिंगवर साडे तीन लाख रूपयांची थैली

मुंबई-आपल्या चित्रपटांना प्रमोट करण्यासाठी आजकाल निर्माते दिग्दर्शक नवनवीन युक्त्या लढवत असतात. इरफान खानच्या ’पान सिह तोमर’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी देखील अशीच क्लृप्ती लढविली आहे.मुंबईच्या पश्चिम भागातील नवश्रीमंत जुहू भागात या चित्रपटाच्या होर्डिंगवर तब्बल साडे तीन लाख रूपयांची पिशवी लटकविण्यात आली आहे. या पिशवीतील पैसे अस्सल चलनी असल्याचे सांगण्यात येते.  या चित्रपटात इरफान एका डाकूची भूमिका करत असून २ मार्च रोजी हा चित्रपट प्रकाशित होणार आहे. त्यामुळेच पिशवीसह हे होर्डिंग येणार्‍या जाणार्‍यांचे लक्ष वेधून घेत आहे. साडे तीन लाखाची ही पिशवी कोण पळविणार याबद्दल परिसरातील नागरिकांत चर्चा रंगली आहे.

Leave a Comment