अॅल्टो व नॅनो आता डिझेल इंधनावर धावणार

मुंबई-छोटया कारच्या विक्रीतील घट रोखण्याचा एक प्रयत्न म्हणून मारुती सुझुकी व टाटा मोटर्स आपल्या अॅल्टो व नॅनो या लहान गाड्यांचे डिझेल मॉडेल बाजाराज आणणार आहेत. छोट्या कारच्या ए – वन व ए – टू मायनस श्रेणीतील कारच्या विक्रीत ५० टक्के घट मागील वर्षात झाली. ही घट रोखता यावी व विक्रीतील सातत्य राखाने यासाठी टाटा नॅनो, तर मारुती अल्टो व वॅगन आरचे डिझेल मॉडेल सादर करण्याच्या तयारीत आहे.

मध्यम व उच्च मध्यमवर्ग हा लहान कारचा टार्गेट ग्राहक असतो. कार लोनवरील वाढते व्याजदर व त्यामुळे वाढलेल्या ‘ईएमआय’ तसेच पेट्रोलच्या  सतत अडकणार्‍या किंमतीमुळेच या ग्राहकांची कार खरेदीकडे पाठ फिरविल्याचे दिसते. म्हणूनच या वर्गाला पुन्हा कारदेखीलकडे आणण्यासाठी कंपन्यांनी हे पाऊल उचलले आहे.