दुबई न्यायालयाने १७ भारतीयांना ठोठावला सहा महिन्यांचा कारावास

शारजहा – बेकायदेशीर मद्य विकण्याच्या आरोपात १७ भारतीयांना दुबईतील न्यायालयाने सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. गुरुवारी न्यायालयात झालेल्या उलट तपासणीत या १७ जणांवरील आरोप सिध्द झाल्यामुळे शारजा न्यायालयाने त्यांना ही शिक्षा सुनावली.
याच १७ जणांवर गेल्यावर्षी एका पाकिस्तानी नागरिकाच्या खूनाचा आरोपही ठेवण्यात आला होता. ही हत्या अनधिकृत दारु विक्रीच्या वादातून झाल्याचे कनिष्ठ न्यायालयात सिद्ध झाल्यामुळे, मृताच्या कुटुंबियांना आर्थिक नुकसानभरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने या आरोपींना दिले होते. तसेच सर्व आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा देखील ठोठावण्यात आली होती. शारजा उच्च न्यायालयाने मात्र या आरोपींच्या शिक्षेत बदल करून, त्यांना दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावून, त्यानंतर सर्व आरोपींना सत्त*ीने मायदेशी पाठविण्याचे आदेश दिले. 
मात्र सरकारी वकिलांनी शारजा न्यायालयाच्या या निर्णयाला संयुत्त* अरब अमिरातीच्या सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने हा खटला पुन्हा शारजा न्यायालयाकडेच वर्ग केला. तेथे आता त्यांना बेकायदेशीर मद्य विकण्याच्या आरोपाखालीही शिक्षा सुनावण्यात आली आहे.