
नवी दिल्ली,दि.१३डिसेंबर- जागतिक मंदीचे परिणाम भारतावरही जाणवू लागले आहेत. आंतराराष्ट्रीय बाजारात रुपयाने आतापर्यंतचा निचांकी स्तर गाठला आहे. मंगळवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ५३.४० पर्यंत गडगडला. मंगळवारी बाजार उघडताच रुपयाची जोरदार घसरण झाली. रुपयाने आतापर्यंतचा निचंाकी स्तर गाठला आहे. औद्योगिक वृध्दीदर अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने खाली आल्याने विदेशी संस्था भारतीय बाजारातून पलायन करीत आहेत. सोमवारी डॉलरच्या तुलनेत रुपया ५२.८४ पर्यंत घसरला होता. यात आणखी घसरण होऊन तो आतापर्यंतच्या सर्वात निचांकी पातळीवर घसरला. शेअर बाजारातील घसरगुंडी तसेच जागतिक बाजारातील डॉलरची मजबुती यामुळे रुपयाचे अवमुल्यान होत असल्याचे बाजा सूत्रांकडून सांगण्यात आले.
