पुलोत्सवात होणार आर. के. लक्ष्मण यांचा विशेष सन्मान

पुणे-आशय सांस्कृतिक आणि परांजपे स्कीमच्या वतीने आयोजीत ‘पुलोत्सव तरुणाई’ चे उद्घाटन सायंकाळी सहा वाजता ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या हस्ते पाथफाईंडर येथे होणार आहे. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांच्या हस्ते लक्ष्मण यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती वीरेंद्र चित्राव यांनी  पत्रकार परिषदेत दिली.आशय सांस्कृतीकचे सतिश जकातदार, परांजपे स्किमचे शशांक परांजपे यावेळी उपस्थित होते. पुलोत्सवात १६ तारखेला सकाळी ११ वाजता पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन कवी संदीप खरे यांच्या हस्ते होणार असून त्यानंतर खरे आपल्या ‘मौनाची भाषांतरे’ वर संवाद साधतील. पुलंच्या ‘हसवणूक’ मधील ‘मी आणि माझा शत्रू पक्ष ः घरबांधणीझ कथेचे कथा-कथन अजित कुंटे सादर करणार आहेत. हे कार्यक्रम ‘पाथफाईंडर’ येथे होणार आहेत. रात्री आठ वाजता न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथे प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्याशी श्रीकांत गद्रे संवाद साधणार आहेत.
१७ तारखेला सकाळी अकरा वाजता अर्काईव्ह थिअटर येथे जगभरातील २५ तरुण दिग्दर्शकांच्या लघुपटांच्या महोत्सवाचे उद्घाटन चित्रपट दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथे सायंकाळी सात वाजता ‘शोध कवितांचा’  कार्यक्रम होणार आहे. रात्री आठ वाजता ‘परिसस्पर्श’ परिसंवादात संजीव अभ्यंकर, सतीश राजवाडे, गुरु ठाकूर, अनिकेत आमटे, अमृता सुभाष सहभागी होणार आहेत.
१८ तारखेला सकाळी अकरा वाजता अर्काईव्ह थिएटर येथे लघुपट महोत्सव, सायंकाळी सहा वाजता पुरस्कार वितरण, सायंकाळी सात वाजता रमणबाग शाळेच्या मैदानावर होणार्‍या अमोल पालेकर यांनी दिग्दर्शित केलेला किशोरी आमोणकर यांच्यावरील भिन्न षड्ज हा लघुपट दाखवण्यात येणार आहे. आठ वाजता जयतीर्थ मेवुंडी यांची सुश्राव्य मैफल होणार आहे. १९ तारखेला सकाळी अकरा वाजता मूळ जर्मन नाटक ‘टेकिग साईड’ चे मराठी रूपांतर ‘मांडिता कैवार’, सायंकाळी रमणबाग शाळेच्या मैदानावर ‘पुलोत्सव जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान कार्यक्रम, ज्येष्ठ कवी पाडगावकर यांच्याशी विशेष संवाद आणि ‘अॅचिव्हर्स’ आदी कार्यक्रम होणार आहेत.

Leave a Comment