मागील काही महिन्यांमध्ये रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने अनेक नियमांमध्ये दुरुस्ती आणि बदल केले आहेत. आता मंत्रालयाने एक नवीन गाईडलाईन जारी केली आहे. ही गाईडलाईन वाहनांच्या टायरमधील हवेसंबंधी आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
आता गाडीत स्टेपनी ठेवण्याची गरज नाही, सरकारने उचलले हे पाऊल
मंत्रालयाने जारी केलेल्या गाईडलाईननुसार, मोटार वाहन कायद्यामध्ये संशोधन करण्यात आले आहे. या अंतर्गत अधिकांश 3.5 टन वजनापर्यंतच्या वाहनांसाठी टायर प्रेशर मॉनिटरिंग प्रणाली सुचवली आहे. या प्रणालीमध्ये सेंसरद्वारे गाडीच्या टायरमधील हवेबाबत ड्रायव्हरला माहिती मिळेल.
हवा कमी असल्यास गाडीमध्ये डॅशबोर्डवर ड्रायव्हरला अलर्ट केले जाईल. यामुळे रस्ते सुरक्षामध्ये वाढ होईल. सोबतच मंत्रालयाने टायर दुरुस्ती किटची देखील शिफारस केली आहे. यात टायर पंक्चर (ट्यूबलेस टायर) झाल्यावर दुरूस्ती किटच्या मदतीने सिलेंटला टायर ट्रेंडमध्ये पंक्चर झालेल्या ठिकाणी एअर सीलसोबत लावले जाते.
टायर प्रेशर मॉनिटरिंग प्रणाली आणि टायर दुरुस्ती किट उपलब्ध झाल्यानंतर वाहनांमध्ये स्टेपनीची आवश्यकता समाप्त होईल.
