चीनमध्ये आता ख्रिश्चन निशाण्यावर, प्रभू येशूंच्या जागी लावण्यास सांगितले राष्ट्रपतीचे फोटो

चीन सरकार उइगर मुसलामांनावर अत्याचार करत असल्याच्या घटना समोर येत असताना आता ख्रिश्चन देखील चीनच्या निशाण्यावर आले आहेत. चीनच्या अनेक राज्य आणि शहरांमधून शेकडो ख्रिश्चन धार्मिक चिन्ह हटविण्यात आले आहेत. क्रॉस काढण्यात आले आहेत. मुर्त्या तोडण्यात आल्या आहेत. प्रभू येशूचा फोटो हटवून राष्ट्रपती शी जिनपिंग आणि माओत्से-तुंगचे फोटो लावण्यास सांगितले आहे. याचा विरोध करणाऱ्यांना मारहाण केली जात आहे.

Image Credited – Aajtak

चीन सरकारने आपल्या आदेशात म्हटले आहे की, ख्रिश्चन समुदायाच्या लोकांनी आपल्या घरातील प्रभू येशूचे फोटो आणि चर्चवरून क्रॉस काढून टाकावेत. त्याच्या जागी चीनच्या कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक माओत्से तुंग आणि राष्ट्रपती शी जिनपिंगचे फोटो लावावेत. मागील एका महिन्यात सरकारने 5 राज्यांमधील शेकडो चर्चमधील धार्मिक चिन्ह काढले आहेत.

Image Credited – Aajtak

ज्या ठिकाणी याचा विरोध करण्यात आला तेथे लोकांना मारहाण करण्यात आली. हुआईनॅन शहरातील शिवान चर्चवरील धार्मिक चिन्ह हटविण्यासाठी जवळपास 100 कर्मचारी क्रेन घेऊन पोहचले होते. यावर लोकांनी विरोध केला असता, त्यांना मारहाण करण्यात आली.

Image Credited – Aajtak

अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, कोणत्याही इमारतीद्वारे धर्माची ओळख झाली नाही पाहिजे. देशात समानता स्थापित करण्यासाठी धार्मिक चिन्ह हटविण्याचे आदेश दिले आहेत. याआधी सरकारने धार्मिक पुस्तके आणि त्याच्या भाषांतरावर बंदी घातली होती.