अमेरिकेच्या अणुऊर्जा उपकरणांच्या पहिल्या कंत्राटाचे एल अँड टीने केले कार्यान्वयन

मुंबई, दि.१५ नोव्हेंबर- अभियांत्रिकी क्षेत्रातील आघाडीची कंपनी लार्सन अँड टुर्बोने अमेरिकेतील अरेवा कंपनी या ट*ान्सन्युक्लिअर कंपनीच्या ड*ाय शिल्ड कॅनिस्टर्सच्या पहिल्या कंत्राटाचे कार्यान्वयन केले. रेडिओअॅक्टिव्ह वेस्ट साठवण ठेवण्यासाठी या उपकरणाचा वापर होतो. कंपनीच्या २३ कॅनिस्टरच्या युनिटपैकी आणखी २ कॅनिस्टर पुढील ऑर्डरमध्ये पूर्ण करणार आहे. हे कॅनिस्टर अमेरिकेच्या अणुउपक्रमातील एक भाग असून त्याची निर्मिती अमेरिकेच्या कोड ऑफ फेडरल रेग्युलेशन्स (१० सीएफआर) आणि न्युक्लीअर सेफटी क्लास १ स्टँडर्डनुसार करण्यात येत असते.
स्टेनलेस स्टीलच्या कॅनिस्टर्सच्या निर्मितीमध्ये फार टॉलरन्स ठेवावा लागत. या कॅनिस्टरचा बोइंग वॉटर रिअॅक्टरसाठी पुरवठा करण्यात येतो. अरेवा कंपनी असलेल्या ट*ान्सन्युक्लिअर इंकने कॅनिस्टरच्या पाच रिपीट ऑर्डर दिल्या असून त्यांचे काम अमेरिका आणि स्वित्झर्लंड येथून होते. एकूण ऑडर्स ७३ युनिट्सवर पोहोचल्या आहे. या कंत्राटांमुळे एल अँड टीची जागतिक स्तराची क्षमता पुन्हा एकदा सिद्ध झाली असून मोठ्या न्युक्लिअर इक्विपमेंट बाजारातही कंपनीचा सहभाग वाढला आहे.