‘सीआरईएस’ चा सहा अभियांत्रिकी महाविद्यालयाशी करार

पुणे, दि.१५ नोव्हेंबर- रोबोटिक्स , संगणक शास्त्र आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स यामध्ये काम करणार्‍या कार्नेजी मेलन आणि टेक्नोफिलिया सिस्टिम यांच्यामध्ये करार झाला आहे. या करारानुसार भारतातील अभियांत्रिकी महाविद्यालये आणि विद्यापीठांशी सेंटर फॅार रोबोटिक्स अँड एम्बेडेड सिस्टिम्स एक्सलन्स (सीआरईएसई) सुरु करण्यात येणार आहेत.
या नवीन तंत्रज्ञान सादरीकरणाच्या पहिल्या भागात भारतातून २५ अभियांत्रिकी संस्था नियुक्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुण्यातील एमआयटी, विश्वकर्मा, भारती विद्यापीठ, आळंदी महाराष्ट* अॅकॅडमी, मॉडर्न कॉलेज आणि पुणे विद्यार्थी गृह या सहा अभियांत्रिकी महाविद्यालयाशी करार करण्यात आला. टेक्नोफिलिया सिस्टिम्सचे संचाकल हिरल संघवी म्हणाले की, रोबोटिक्स हे माध्यम वापरुन विद्यार्थ्यांचे रुपांतर उत्तम दर्जाच्या अभियंत्यामध्ये करणे हा सीआरईएसई सुरु करण्यामागचा प्रमुख उद्देश आहे.

Leave a Comment