
नवी दिल्ली – आपली नवीन एमजी हेक्टर प्लस भारतीय बाजारपेठेत एमजी (मॉरीस गॅरेज) मोटर इंडियाने लाँच केली असून हेक्टर प्लस ही भारतातील पहिली सहा आसनी इंटरनेट एसयूव्ही असून पॅनोरमिक सनरूफसह ती येत आहे. या सहा आसनी हेक्टर प्लसमध्ये उत्कृष्ट आणि आरामदायी कॅप्टन सीट्स देण्यात आल्या आहेत. 6-सीटर एसयूव्ही ही नव्या ड्युएल-टोन स्मोक्ड सेपिया ब्राउन इंटेरिअरमुळे आतून खूप अपिलिंग लूक देते.
भारतात लाँच झाली एमजी मोटरची नवीन सहा आसनी एसयूव्ही ‘हेक्टर प्लस’
गाडीचे आकर्षण नव्या स्टायलिश हेडलँप्ससह, एक नवे क्रोम-स्टडेड फ्रंट ग्रिल आणि आय-स्मार्ट नेक्स्ट जनरेशनसाठी चिट-चॅट फीचरमुळे वाढले आहे. आणखी आकर्षक सुविधा यात असून त्यात नवे स्मार्ट स्वाइप, फ्रंट आणि रिअर बम्पर्स, न्यू रिअर टेल लाइट डिझाइन आणि रिवाइज्ड स्किड प्लेट्स आहेत. एमजी शील्ड अंतर्गत कंपनी एमजी फ्री-तीन, ‘5एस’, म्हणजेच फ्री 5-वर्ष/अनलिमिटेड किमी वॉरंटी, फ्री 5-वर्ष रोडसाइड असिस्टंस आणि पहिल्या 5 सर्व्हिससाठी फ्री लेबर चार्जचा विस्तार करण्यात आला असून या एसयूव्हीची भारतीय बाजारपेठेत किंमत 13.48 लाख रुपये (एक्स-शोरूम) ऐवढी ठेवण्यात आली आहे.
