Samsungच्या ‘या’ फ्रिजसोबत मिळणार 39 हजार रुपयांचा स्मार्टफोन मोफत


दक्षिण कोरियन कंपनी सँमसंगने भारतात SpaceMax Family Hub Refrigerator लॉन्च केला असून जवळपास 2,19,900 रुपयांच्या घरात या फ्रिजची किंमत आहे. पण हा फ्रिज सध्या ग्राहकांना ऑफर अंतर्गत 1,96,990 रुपयांना खरेदी करता येणार आहे. काही शानदार फिचर्स यामध्ये देण्यात आले असून याच्या खरेदीवर कंपनी ग्राहकांना 37,999 रुपयांचा सॅमसंग गॅलेक्स नोट 10 हा स्मार्टफोन मोफत देणार आहे. त्याचबरोबर आजपासून 26 जुलै दरम्यान याचे प्री-बुक केल्यास त्यासाठी 9 हजार रुपयांचा कॅशबॅकचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे.

657 लीटरचा स्टोरेज प्रीमियम ब्लॅक मॅट फिनिशिंग असलेला हा फ्रिजमध्ये देण्यात आला आहे. त्याचबरोबर घरातील अन्य स्मार्ट होम अप्लायंसेससोबत हा फ्रिज कनेक्ट करता येणार आहे. होम कंट्रोल आणि फॅमिली हब स्क्रिन सारखे फिचर्स यामध्ये देण्यात आले असून ग्राहकांना कनेक्ट करण्यात आलेल्या अप्लायंसेसवर कंट्रोल आणि मॉनिटरिंग करता येणार आहे. रेफ्रिजरेटरचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे फ्रिजचा दरवाजा खुला न करता आतमध्ये ठेवण्यात आलेल्या गोष्टी याच्या फुड मॅनेजमेंट फिचरच्या मदतीने तपासून पाहता येणार आहे.

21.5 इंचाचा फुल एचडी टचस्क्रिन रेफ्रिजरेटरसाठी देण्यात आला आहे. 15 वॅट स्पीकर्ससह हा फ्रिज येणार आहे. या फ्रिजच्या सहाय्याने युजर्सला त्यांचा स्मार्टफोन किंवा टीव्ही स्क्रिन सुद्धा बनवता येणार आहे. रेफ्रिजरेटरच्या फॅमिली कनेक्शन म्हणून देण्यात आलेल्या फिचरच्या मदतीने फोटो शेअर करण्यासह टेक्स मेसेज सुद्धा पाठवता येणार आहेत. रेफ्रिजरेटरमध्ये ब्लुटुथ आणि Bixby वॉइस असिस्टंट सपोर्ट देखील देण्यात आला आहे.
https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/07/SpaceMax-Family-Hub-Refrigerator.jpg
ऑलराउंड कुलिंग फ्रिजमध्ये देण्यात आले आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, याची डिजिटल इन्वर्टर टेक्नॉलॉजी 50 टक्क्यांपर्यंत वीजेची बचत करते. फ्रिजमध्ये घाण वास येऊ नये म्हणून यासाठी खास डिओडराइजिंग फिल्टरचा वापर केला असून बिल्ट-इन-कार्बन फिल्टरच्या मदतीने सातत्याने हवा पास करतो. रेफ्रिजरेटरचे फिचर्स कंन्ट्रोल करण्यासाठी सँमसंगचा स्मार्ट थिंग्स या अॅपचा वापर करता येणार आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment