सेन्सेक्स ७०४ अंकांनी गडगडला

मुंबई दि.२२ सप्टेंबर- अमेरिकी आणि युरोपियन अर्थव्यवस्था मोठ्या संकटात सापडल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी जागतिक शेअर बाजारात मोठी घसरण झाली. जगातील अन्य शेअर बाजाराप्रमाणे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्सही गडगडला. सेन्सेक्सला तब्बल ७०४ अंकांचा फटका सहन करावा लागला. गेल्या २६ महिन्यांमधील सेन्सेक्सची ही सर्वात मोठी घसरण आहे.सकाळी सेन्सेक्स घसरण घेत उघडला आणि उत्तरोत्तर विक्री झाल्याने निचांकी स्तरावर म्हणजे १६ हजार ३६१ अंकांवर सेन्सेक्स बंद झाला. राष्ट*ीय शेअर बाजाराच्या निफ्टीचीही मोठी पडझड झाली. निफ्टी २०० पेक्षा जास्त अंकांची घट घेत ४९२३ अंकांवर बंद झाला.