मन्सूर अली खान पतौडी यांचे निधन

नवी दिल्ली-भारतीय क्रिकेट संघाचे यशस्वी कर्णधार अशी ख्याती मिळविलेले मन्सूर अली खान पतौडी यांचे दि.२२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३0 वाजता येथील सर गंगाराम रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते ७0 वर्षांचे होते.पतौडी यांना फुप्फुसात संसर्ग झाल्याने मागील महिन्यापासून ते या रुग्णालयात भरती होते.त्यांच्या पश्‍चात पत्नी अभिनेत्री शर्मिला टागोर, पुत्र अभिनेता सैफ अली खान, कन्या अभिनेत्री सोहा, फॅन्सी डिझायनर सबा आहेत.

Leave a Comment