इचलकरंजीत होणार देशातील पहिले टेक्निकल टेक्सटाईल पार्क

इचलकरंजी दि.३० ऑगस्ट- देशातील पहिले टेक्निकल टेक्सटाईल पार्क इचलकरंजी येथे स्थापन करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे दिली. श्री लक्ष्मी औद्योगिक वसाहत येथे झालेल्या कामगार उद्योजक मेळाव्यात ते बोलत होते.
टेक्निकल टेक्साईल पार्कमुळे पारंपारिक व्यवसायात व्हॅल्यू अॅडिशन होणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, पारंपारिक मागाबरोबरच आधुनिक मागामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करता येईल. यामुळे नफ्यातही वाढ होईल. पारंपारिक व्यवसायात काम जास्त व नफा कमी आहे. औद्योगिक आणि वस्त्रोद्योग धेारणामुळे नक्कीच छोट्या आणि मध्यम उद्योजकांना चांगला दिलासा मिळेल. यावेळी वनमंत्री पतंगराव कदम, गृह राज्यमंत्री सतेज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. माजी राज्यमंत्री प्रकाश आवाडे यांनी वस्त्रोद्योग वाढविण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न करावेत, अशी मागणी केली.