अण्णांचे पाकिस्तानातही वाढते समर्थक

नवी दिल्ली – देशातील भ्रष्टाचाराच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषण सुरु केल्यापासून त्यांना पाकिस्तानातूनही मोठे समर्थन मिळत आहे. दिवसेंदिवस पाकिस्तानातील अण्णांच्या समर्थकांची संख्या वाढत चालली आहे, असे पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाच्या सदस्या जोहरा युसूफ यांनी शनिवारी सांगितले.
पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आहे. रोजच्या आयुष्यात सामान्य जनतेला भ्रष्टाचाराला सामोरे जावे लागते. भ्रष्टाचाराला आळा बसला तर सामान्य जनाचे आयुष्य सुखकर होईल. भ्रष्टाचार केवळ सरकारी पातळीवरच नव्हे तर छोट्या-छोट्या क्षेत्रांमध्ये वाढत चाचला आहे.  त्याला आळा घालणे गरजेचे बनले असल्याचे जोहरा युसूफ यांनी सांगितले.