
14 जून रोजी मुंबईतील आपल्या राहत्या घरी अभिनेता सुशांत सिंह राजपूतने गळफास लावून आत्महत्या केल्यानतंर बॉलीवूडमधील अनेकांना त्याच्यामुळे धक्का बसला. सुशांतच्या अचानक एक्झिटमुळे सर्वांनाच दु:ख झाले असून प्रत्येकजण त्याच्यासोबतच्या आठवणी ताज्या करत आहेत. याच दरम्यान सोशल मीडियात एक मोठी भावनात्मक पोस्ट सुशांत सिंह याचा खास मित्र संदीप सिंह याने लिहिली आहे. सुशांतसोबत व्यथित केलेल्या क्षणांची या पोस्टमध्ये आठवण करत जर आम्ही तुझ्यासोबत असतो तर तु असे केलेच नसतेस असे त्याने म्हटले आहे.
सुशांतला आत्महत्या करण्यापासून अंकिता वाचवू शकली असती ? निर्मात्याची भावनात्मक पोस्ट
आपल्या पोस्टमध्ये संदीप सिंह याने अंकिता लोखंडे हिचे नाव लिहिले आहे. तसेच आपण एकत्र घालवलेला वेळ आठवून जर आम्ही थोडासा जरी प्रयत्न केला असता तर सुशांतला ऐवढे टोकाचे पाऊल उचलण्यापासून थांबवू शकलो असतो. तुम्ही भले वेगळे झालात पण तु नेहमीच्या तिच्या सुखासाठी देवाकडे मागणी केली. तुमचे प्रेम पवित्र होते. आज ही तिच्या नावाची घरातील प्लेट तु काढलेली नाहीस. आपण सर्वजण फॅमिली सारखे एकत्र रहायचो. या सर्व गोष्टी आठवून मला रडू येते. सुशांत याने दिलेली वचने आणि त्याच्या गोष्टींबाबत सुद्धा संदीप सिंह याने पोस्टमध्ये लिहिले आहे. तर सुशांत सिंह याच्या निधनानंतर अंकिता लोखंडे ही संदीप सिंह याच्यासोबत सुशांतच्या परिवाराला भेटण्यासाठी गेली होती.
