भायखळ्यातील प्रसिद्ध कंपनीच्या इमारतीत महापालिकेचे 1000 बेड्ससह क्वारंटाईन सेंटर तयार


मुंबई – देशात सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत असून येथील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत सातत्याने वाढ होत असून मुंबईतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 64,068 वर पोहोचल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.

पण मुंबईतील रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी जागा अपुरी पडत असून काही रुग्णांना तर घरातच क्वारंटाईन राहण्यास सांगण्यात येत असल्यामुळे भायखळा येथील रिचर्डसन अॅण्ड क्रुड्स या इंजिनीअरिंग कंपनीने आपले ऑफिस क्वारंटाईन सेंटरसाठी दिले होते. त्यानुसार या कंपनीत मुंबई महानगरपालिकेने 1000 बेड्स सह क्वारंटाईन सेंटर उभारले आहे.


भायखळ्यातील या इमारतीत 1000 बेड्समध्ये 300 आयसीयू बेड्स आहेत. ज्यात ऑक्सिजन पुरवठा आणि अन्य सुविधा देण्यात आल्या आहेत. रिचर्डसन अॅण्ड क्रुड्स कंपनीत तयार करण्यात आलेले क्वारंटाईन सेंटर जूनच्या अखेरीस सुरु करण्यात येईल. कोरोना बाधित रुग्णांसाठी तयार करण्यात आलेले हे सेंटर खूपच फायदेशीर ठरेल,असे मुंबई महापालिकेकडून सांगण्यात येत आहे.

Leave a Comment