नागपूर दि.२५ – नंदनवन परिसरात दहशत माजविणाऱ्या,खून करण्याच्या प्रयत्न करणारा कुख्यात गुंड प्रशांत चलपे याला पोलिस आयुक्त डॉ.अंकुश धनविजय यांनी मोक्का कायदातंर्गत स्थानबद्ध केले आहे.
नागपूरच्या झोपडपट्टी गुंडाला मोक्काखाली अटक
प्रशांत चलपे याच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टी वाले, औषधी द्रव्य संबंधीत गुन्हेगारी कलमांतर्गत स्थानबद्ध करुन त्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.
प्रशांत चलपे याने नंदनवन परिसरात जबरी चोरी करतांना गंभीर दुखापत करणे, खून करण्याचा प्रयत्न करणे, जीवे मारण्याची धमकी देणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे त्याच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात दाखल आहेत. त्याच्यावर यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करून सुद्धा त्यांनी आपली गुन्हेगारी प्रवृत्ती सोडलीच नव्हती. शेवटी पोलिस आयुक्त डॉ. अंकुश धनविजय यांच्या आदेशावरून अप्पर पोलिस आयुक्त शांताराम वाघमारे यांनी त्याच्यविरुद्ध कारवाई करुन कारागृहात रवानगी केली.
