वृद्धाचा खून करून सव्वातीन लाखाची चोरी

पुणे दि २५ – वयोवृद्ध व्यक्ती घरात एकटी असताना त्याचा खून करून मोठी चोरी करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा काल गुरुवारी रात्री अकरा  वाजता पुण्यातील मित्रमंडळ कॉलनीत झाला आहे .त्यात हरी वासुदेव ढमढेरे (वय ८४) यांचा खून झाला व घरातील तीन लाख वीस हजार रुपये चोरांनी पळवले.

हरिभाऊ ढमढेरे हे मित्र मंडळ कॉलनीत इमारत क्रमांक १५, आराधना येथे पत्नीसह राहत होते. त्यांच्या पत्नी काल राहण्यास नातेवाईकांकडे गेल्या होत्या. रात्री साव्वाअकाराच्या सुमारास चोरट्यांनी प्रवेश करून तिजोरीचे कपाट फोडण्याचा प्रयत्न केला. तो फोडण्याचा आवाज ऐकून ढमढेरे जागे झाले व त्यांनी तिजोरीच्या खोलीत येऊन प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण ते  प्रतिकार करू शकले नाहीत. त्यांचा धारदार शास्त्राने खून करण्यात आला.

सकाळी पोलीस आल्यावर त्यांचे प्रेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. दत्तवाडी पोलीस पुढील तपास करीत आहेत. 

Leave a Comment