सोलापूर २१ मार्च – पालिकेच्या हद्दवाढ भागाचे विशेष कार्यकारी अधिकारी अनिल विपत यांना उपायुक्त करण्याचा ठराव मनपा सभेत गोंधळात मंजूर करण्यात आला. सत्ताधारी पक्षाने गेले वर्षभर कोणत्या ना कोणत्या कारणाने विपत यांची पुर्नस्थापना प्रलंबित ठेवली होती.
सोलापूर : विपत यांना उपायुक्त करण्याचा ठराव गोंधळात मंजूर
मनपा सभेत आयुक्तांनी, त्यांना पुणे मनपात प्रतिनियुक्तीवर पाठविण्याच्या प्रस्तावात दुरुस्ती सुचवून उपायुक्त करण्यचा ठराव गोंधळात बहुमताने मंजूर केला. सत्ताधारी पक्ष हा ठराव एकमताने करण्याच्या खटपटीत होते. पण त्यास भाजपा, सेनेने हरकत घेतली. त्यावर पुन्हा सभागृहाबाहेर तीन तास बैठक झाली. अखेर विपत यांचे पुनःप्रस्थापन करून सत्ताधारी पक्षाने दिलेला शब्द पाळला.
