गोवा : गोव्यात होलिकोत्सव उत्साहात साजरा

पणजी, २१ मार्च – शिमगोत्सवाचा एक भाग म्हणून गोव्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात होलिकोत्सव साजरा करण्यात आला.खेड्यांबरोबरच शहरांतही रंगाची उधळण करत लोकांनी त्यात भाग घेतला.लहान मुले, तरूण आणि वयोवृध्द एकमेकांना रंगात रंगवून हा उत्सव साजरा करतात.

गोव्यात गेल्या काही दिवसापासून ठिकठिकाणी शिमगोत्सव सुरू झाले आहेत. होळी हा शिमग्यातला महत्वाचा उत्सव मानला जातो. शिमगोत्सवानिमित्त विविध गावांमध्ये वेगळ्या चालीरीती पाहायला मिळतात. शिमग्यानिमित्त पुन्हा एकदा प्राचीन संस्कृती जागवली जाते. येत्या आठवड्यात विविध शहरांमध्ये राज्यस्तरावर शिमगोत्सव साजरा केला जाणार असून सरकारी पातळीवर मोठ्या बक्षिसांसहीत रोमटामेळ तसेच चित्ररथ स्पर्धा आयोजित केल्या जातात. विविध गावची विविध पथके अगदी पारंपरिक वेषात ढोल – ताशांसहीत त्यात भाग घेत असतात.