मुंबई १६ मार्च – पोलाद उद्योगात कार्यरत असलेल्या आघाडीच्या जिंदाल उद्योग समुहाच्या ठिकाणांवर बुधवारी आयकर विभागाने छापे टाकले. करचोरी केल्याच्या संशयावरुन हे छापे टाकण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. परचेस ऑर्डर तसेच अन्य वित्तीय व्यवहाराच्या अनुषंगाने तपास केला जात आहे.
मुंबई : आयकर विभागाचे जिंदाल समुहाच्या ठिकाणांवर छापे
आयकर विभागाकडून करण्यात आलेली ही नियमीत तपासणी असल्याचा दावा जेएसडब्ल्यू समुहाच्या प्रवक्त्या शर्मिला बॅनर्जी यांनी केला. तपासकामात आयकर विभागाला पूर्ण सहकार्य केले जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. आयकर विभागाकडून कोणते प्रश्न विचारण्यात आले, असे विचारता असता त्यावर भाष्य केले जाऊ शकत नाही, असे बॅनर्जी यांनी नमूद केले.
