नवी दिल्ली : डिझेल विक्रीवरील तेल कंपन्यांचे नुकसान १६ रु. पर्यंत पोहोचले

नवी दिल्ली १६ मार्च – जागतिक बाजारपेठेतील क्रूड तेलाचे दर मोठ्या प्रमाणावर वाढल्याच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांचा तोटा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.डिझेलच्या विक्रीवरील तेल कंपन्यांचा तोटा लिटरमागे तब्बल १५.७९ रु.इतका झाला आहे.पेट्रोलच्या दरावरील निर्बंध उठविण्यात आले असले तरी डिझेल,केरोसिन आणि घरगुती वापराच्या एलपीजी वायूवरील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, हिदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम यांच्याकडून सबसिडीच्या दरात डिझेलची विक्री केली जाते. नुकसान भरुन काढण्यासाठी उत्पादन शूल्क आणि आयात शूल्क कमी करण्याची मागणी तेल कंपन्यांनी सरकारकडे केली होती. तथापि बजेटदरम्यान वित्तमंत्र्यांनी तेल कंपन्यांच्या या मागणीकडे साफ दुर्लक्ष केले. जागतिक बाजारपेठेतील क्रूड तेलाचे दर सध्या १०० डॉलर्स प्रतिबॅरलच्या आसपास आहेत.

Leave a Comment