पुणे दि ११ वंचित घटकांतील मुलींना शिक्षण मिळाले तरच खर्यात अर्थाने महिला सबलीकरण झाले असे म्हणता येईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष सुरेश घुले यांनी आज केले.
वंचित घटकांतील मुलींना शिक्षण मिळाले तरच खऱ्या अर्थाने महिला सबलीकरण झाले : सुरेश घुले
पुण्यश्लोक जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात घुले बोलत होते. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा शोभाताई पवार, मगरपट्टा सीटीचे संचालक आबासाहेब पवार, आळंदीचे नगराध्यक्ष विलास कुऱ्हाडे, दिलीप काळभोर, बबनराव कुऱ्हाडे, माधव कदम, नथूभाऊ घुले, सचिव सुनील पवार आदी उपस्थित होते.
घुले म्हणाले, केवळ कष्टकरांच्या मुलींसाठी स्थापन केलेली ही संस्था मुली शिक्षित व्हाव्यात या उद्देशाने मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करते ही स्तुत्य बाब असून समाजातील इतरांनीही अशा विद्यार्थिनींसाठी मदत करणे आवश्यक आहे. सर्व शिक्षा अभियान हा केंद्र सरकारने सुरू केलेला उपक्रम योग्य अंमलबाजावणी झाल्यास खूपच फायद्याचा असून याद्वारे उद्याच्या उज्ज्वल भारतातील नारी घडतील, असेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविक संस्थेचे सचिव सुनील पवार यांनी केले.
