
न्यूयॉर्क दि ११ अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांची प्रेयसी मोनिका ल्युविन्स्की अजूनही क्लिंटन यांच्या प्रेमात असल्याचे वृत्त तिच्या मित्रमंडळींनी दिले आहे.डेलि मेलला दिलेल्या माहितीनुसार ३७ वर्षीय मोनिकाने क्लिंटन प्रकरणानंतर व्यवसाय सुरू केला होता तसेच टिव्ही रिअॅलिटी शो मध्येही ती सहभागी झाली होती. पण तिने अजून लग्न केलेले नसून त्यामागे ती क्लिंटन यांना विसरू शकत नाही हेच कारण असल्याचे सांगण्यात आले आहे. कोणताच पुरूष क्लिंटनसारखे आपल्याला सुखी करू शकणार नाही असा तिचा दावा आहे.
