नवी दिल्ली, ६ मार्च – जपानी वाहन कंपनी यामाहाने आगामी काळात भारतात इलेक्ट्रिक मोटरसायकल सादर करण्याचे ठरविले आहे. इंडिया यामाहा मोटरमार्फत यामाहा भारतात कार्यरत आहे. भारतीय बाजारपेठेचा विचार करुन स्कूटरचा विकास केला जात असल्याची माहितीही इंडिया यामाहा मोटरचे विक्री आणि विपणन विभागाचे संचालक जून नकाता यांनी दिली.
नवी दिल्ली : यामाहा इलेक्ट्रिक मोटरसायकल बाजारात आणणार
चालू वर्षी दोन मोटरसायकली भारतात लाँच केल्या जाणार असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, जागतिक बाजारपेठेतील इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढतच असल्याने इलेक्ट्रिकवर चालणसार्यां मोटरसायकलींना चांगली मागणी येणार आहे. सध्या जपान आणि युरोपमध्ये यामाहाकडून इलेक्ट्रिक मोटरसायकलींची विक्री केली जाते.
