मुंबई : कंपन्यांच्या बाजारमुल्यांत ६९ हजार कोटींची वाढ

मुंबई, ६ मार्च – गेल्या आठवड्यात शेअर बाजारात जबरदस्त तेजी आल्याच्या पार्श्वभूमीवर ब्लूचीप कंपन्यांच्या बाजारमुल्यात ६९ हजार ५५ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी कोल इंडियाचे बाजारमूल्य सर्वाधिक २० हजार ८७६ कोटी रुपयांनी वाढून २ लाख ५ हजार २५० कोटी रु. इतके झाले.रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी या कंपन्यांच्या बाजारमुल्यातही वाढ झाली दूरसंचार क्षेत्रातील भारती एअरटेलचे बाजारमूल्य मात्र घटले.

एफएमसीजी क्षेत्रातील कंपनी आयटीसीचे बाजारमूल्य १२ हजार ६७१.५५ कोटी रु. नी वाढून १ लाख ३३ हजार २४६ कोटी रु. इतके झाले. बाजारमुल्याच्या बाबतीत अग्रस्थानी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य ५ हजार २०३ कोटी रु. नी वाढून ३ लाख २१ हजार ३६३ कोटी रु. इतके झाले. सार्वजनिक क्षेत्रातील तेल आणि वायू कंपनी ओएनजीसीचे बाजारमूल्य ४ हजार ८३४ कोटींनी वाढून २ लाख २९ हजार ८०० कोटी रु. इतके झाले.

Leave a Comment