औरंगाबाद – मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेटण्यासाठी वेरुळला जात असताना मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली होती. जखमी अवस्थेत पोलिसांनीच जाधव यांना रुग्णालयात दाखल केले होते. यासंदर्भात शुक्रवारी विशेष पोलिस महानिरीक्षक संजयकुमार यांनी खुलताबाद येथे जाऊन चौकशीला प्रारंभ केला.
आ. जाधव यांना बेदम मारहाण केल्याप्रकरणाची चौकशी सुरु
मनसेचे विधानसभेतील गटनेत, आ. बाळा नांदगावकर यांनी औरंगाबाद येथे जाऊन आ. जाधव यांची विचारपूस केली होती तसेच गृहमंत्री पाटील यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. त्यानंतर गृहमंत्री पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश विशेष पोलिस महानिरीक्षक संजयकुमार यांनी दिले होते. त्यानुसार शुक्रवारी खुलताबाद येथे जाऊन संजयकुमार यांनी चौकशीला प्रारंभ केला. वेरुळ लेणी येथे बंदोबस्ताला असणार्या पोलिस कर्मचार्यांकडे त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली. सदर चौकशीचा अहवाल संजयकुमार गृहमंत्री पाटील यांना देतील.
